ग्रामीण विकास विभागाने आता कात टाकली; ड्रोनद्वारे होणार आता प्रत्येक मालमत्तांचे सर्वेक्षण !

Foto
औरंगाबाद : गावाच्या हद्दीत तसेच सर्वसामान्यांच्या मालकी हक्काचे जतन करण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील प्रत्येक गावाचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून मालकी हक्काच्या जागा, घरे, रस्ते त्याच बरोबर नदी व नाल्यांची ही सर्वेक्षण केले जात आहे. जिल्ह्यात लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून सर्वसामान्यांच्या मालमत्तांच्या नोंदी याद्वारे केल्या जातील.

 जमिनीच्या बाबतीत असंख्य किचकट प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. गावठाणांच्या जागा, मोकळ्या जागेवरील अतिक्रमणे याच बरोबर नद्या आणि नाल्यांवरही अवैधरित्या कब्जा केलेला दिसतो. गावठाणांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गावातील प्रत्येक घर, गल्ली, गावाची सीमा त्याच बरोबर छोटे ओढे-नाले यासह नद्यांचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकाच्या मालकी हक्काचे घर रेखांकित करून त्याआधारे त्याची नोंद घेतली जाणार आहे. अशाप्रकारे ग्रामीण भागातील सर्वच नागरिकांना मालकी हक्काचा पुरावा देण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालय आता सरसावले आहे. जमाबंदी आयुक्तालय पुणे तसेच भारतीय सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावच्या सर्व हद्दी पांढऱ्या रंगाच्या चुन्याने रेखांकित केल्या जाणार आहेत. गावठाणांच्या जागा, शासकीय मालमत्ता यांचे नकाशे चित्रित करून माहितीसाठी गाव पातळीवर लावले जाणार आहेत. प्रत्येक रस्त्याला, गल्लीला विशिष्ट नाव अथवा नंबर देऊन ओळख दिली जाणार आहे. नागरिकांच्या सर्व मालमत्ता जीआयएस प्रणालीद्वारे रेखांकित करून अधिकार पत्रिकेवर नाव दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या मालकी हक्काचा पुरावा सहज उपलब्ध होणार असल्याचे बोलले जाते. शासनाच्या या निर्णयाने मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असलेली प्रकरणे त्याच बरोबर किचकट शासकीय नियमांमुळे अडचणीत आलेले अनेक वाद-विवाद सोडवले जाऊ शकतात. आपल्या मालकी हक्काच्या पुराव्यासाठी शेकडो कागदपत्रांची जुळवाजुळव करून त्रस्त झालेल्या अनेकांना या पद्धतीने दिलासा मिळणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाने अतिशय सूक्ष्म आणि अचूक पद्धतीने मोजणी केली जाईल.त्याच बरोबर नव्या पद्धतीचे पुरावे अतिशय सुरक्षित राहतील असेही बोलले जाते.

 जिल्ह्यात लवकरच सुरुवात 
याबाबत महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले की ड्रोन द्वारे केले जाणारे सर्वक्षण जिल्ह्यात ही लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक गावाची खडानखडा माहिती तसेच नकाशे या तंत्रज्ञानाने साठविले जातील. ग्रामपंचायतीची हद्द मोकळ्या शासकीय जागा त्याच बरोबर खाजगी मालमत्तांचेही सर्वेक्षण करून मालकी हक्काचे पुरावे नागरिकांना मिळतील, असे सूत्रांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker